Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, उद्धव ठाकरेंचा इशारा

कोविड योद्धा होता आलं नाही, तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, उद्धव ठाकरेंचा इशारा
SHARES

आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आलं नाही, तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसंच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. 

यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के

नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. कोविडविषयक नियमांचं पालन न केल्याने, तसंच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही  आपण धोका पोहोचवत आहोत. माझं आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यामध्ये ऑक्सिजनचं मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद, जाणून घ्या कारण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा