Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

सरकार ‘या’ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर देणार भर

कोरोना विषाणूचा संसर्ग तरूण आणि प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

सरकार ‘या’ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर देणार भर
SHARES

केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यांना खुल्या बाजारातून थेट लस खरेदी करण्यास देखील परवानगी दिली आहे. यामुळे देशातील लसीकरण माहिमेला वेग येईल, असं म्हटलं जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग तरूण आणि प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

हेही वाचा- सीरमनं वाढवली कोविशिल्ड लसीची किंमत, आता 'या' किंमतीत लस उपलब्ध

सध्या जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये आहे. त्यातुलनेत सीरम इन्स्टिट्यूट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४००, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये याप्रमाणे दर आकारणार आहे. त्यामुळे कोविशिल्ड असो की आयात केलेली लस असो त्याचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

आतापर्यंत केवळ केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लस विकत घेऊन ती राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना पुरवत होतं. आता राज्य सरकार देखील ही लस खरेदी करण्यास सक्षम असेल. लस उत्पादक कंपनी एकूण लस उत्पादनापैकी ५०% केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी आणि उर्वरित ५०% लस राज्य सरकार तसंच खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून देईल.

याचसोबत रशियाची स्पुटनिक व्ही आणि अमेरिकेतील जाॅन्सन अँड जाॅन्सन कंपनीची लस देखील लवकरच रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांना बंद ठेवावं लागत आहे. लशींचा मुबलक पुरवठा झाल्यास लसीकरणाला वेग येईल, असं म्हटलं जात आहे.

(maharashtra government to push covid 19 vaccination programme speedly says rajesh tope)

हेही वाचा- कारखान्यांच्या ठिकाणीच उभारणार हाॅस्पीटल्स, आॅक्सिजन तुटवड्यावर सरकारची नवी शक्कल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा