Advertisement

नाईट कर्फ्यू संपणार की सुरूच राहणार?

नाईट कर्फ्यू संपत असल्याने तो पुन्हा नव्याने लागू केला जाणार की संपणार? अशी चर्चा रंगली आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे.

नाईट कर्फ्यू संपणार की सुरूच राहणार?
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा नाईट कर्फ्यू संपत असल्याने तो पुन्हा नव्याने लागू केला जाणार की संपणार? अशी चर्चा रंगली आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी उत्तर दिलं आहे.

रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने मुंबईकर घराबाहेर पडत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं. त्यातच मुंबई महापालिकेने (bmc) रात्रीच्या वेळे काही नाईट क्लबवर कारवाई केल्यावर तिथं हजारो लोकं विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करताना आढळून आले. संबंधित नाईट क्लबवर कारवाई केल्यानंतर नवीन वर्षांच्या निमित्ताने पुन्हा गर्दी होऊन कोरोना विषाणूच्या प्रसाराला चालना मिळू नये म्हणून प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली. 

हेही वाचा- नव्या कोरोना रुग्णांबद्दल आरोग्यमंत्री म्हणाले...

दिवसभर घरात बसून अनेकजण रात्री मोकाट फिरत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाला मिळत होत्या. सध्याच्या स्थितीत आपण दिवसा लाॅकडाऊन करू शकत नाही. परंतु जनतेला अजूनही बंधनांची आवश्यकता आहे. तशी त्यांना जाणीव करून देण्यासाठीच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. निदान रात्रीची संचारबंदी आहे, म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. सध्याच्या काळात अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले होते. 

परंतु संचारबंदीची मर्यादा संपत असल्याने तसंच महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या नव्या प्रकारचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईत रात्रीची संचारबंदी वाढवणार की नाही? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. 

त्यावर त्यांनी मुंबई लोकल, नाईट कर्फ्यू यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती दिली. आपण दररोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेऊन आहोत. नव्या स्ट्रेनच्या कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचाही आपण शोध घेत आहोत. सर्व प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांना तपशीलासह देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीवर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

(maharashtra health minister rajesh tope clarifies on night curfew in mumbai)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा