Advertisement

राज्यात रविवारी कोरोनाचे ४०९२ नवीन रुग्ण

महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे नवीन ४०९२ रुग्ण आढळले. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात रविवारी कोरोनाचे ४०९२  नवीन रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे नवीन ४०९२ रुग्ण आढळले. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला. तसंच रविवारी १३५५ जण बरे होऊन घरी परतले. 

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २० लाख ६४ हजार २७८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना बळींचा आकडा ५१,५२९ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ३५ हजार ९६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत रविवारी कोरोनाचे ६४५ नवे रुग्ण आढळले. तर ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ लाख १४ हजार ७६ झाली आहे.  तर कोरोनाबळींचा आकडा ११ हजार ४१७ इतका झाला आहे. रविवारी ३०९ रुग्ण बरे झाले. मुंबईत सध्या ५६०८ रुग्ण उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज २ हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी पुण्यात ६३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.



हेही वाचा -

मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा