Advertisement

राज्यातील पहिला ओमिक्रॉन रुग्ण झाला कोरोनामुक्त

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून २२ नोव्हेंबरला हा रुग्ण आला होता.

राज्यातील पहिला ओमिक्रॉन रुग्ण झाला कोरोनामुक्त
SHARES

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून २२ नोव्हेंबरला रोजी डोंबिवलीत आलेला ओमिक्रोन बाधित ३३ वर्षीय रुग्ण करोनामुक्त झाला आहे. बुधवारी त्याचा ओमिक्रोन आणि कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यांनातर त्याला संध्याकाळी सहा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

पुढील सात दिवस त्याला घरगुती विलगिकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे. तर उर्वरित नायजेरियामधून आलेल्या त्या चार करोनाग्रस्त रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.

सुरुवातीला कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली होती. त्यानंतर आज गुजरातमध्येही एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय.

दरम्यान, ऑमिक्रॉनमुळं सर्वत्र भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात आतापर्यंत ऑमिक्रॉनचे १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसंच, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ६५ जणांचे नमुने पाठविण्यात आले असून, रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

''जगभरात मृत्युदर अत्यंत कमी आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती दिसते तशी नाही. आपण केंद्र सरकारच्या सूचनांनुसार काम करत असून, तशा उपाययोजना केल्या जात आहेत'', असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ओमिक्रॉनसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात १० रुग्णांना नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर ६५ जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.हेही वाचा

ऐकावे ते नवलंच! मेंदू हॅक होत असल्याची तक्रार, सायबर पोलिसही चक्रावले

ऑमिक्रॉनच्या चाचणीसाठी पालिका S-Gene RT-PCR किट खरेदी करणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा