Advertisement

ऑमिक्रॉनच्या चाचणीसाठी पालिका S-gene RT-PCR किट खरेदी करणार

याचा वापर COVID-१९ च्या Omicron प्रकाराचा लवकर शोध घेण्यासाठी केला जातो.

ऑमिक्रॉनच्या चाचणीसाठी पालिका S-gene RT-PCR किट खरेदी करणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) S-gene RT-PCR किट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याचा वापर COVID-१९ च्या Omicron प्रकाराचा लवकर शोध घेण्यासाठी केला जातो. या किट्सच्या खरेदीसाठी, लवकरच निविदा काढल्या जातील, असं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

वृत्तानुसार, घेण्यात आलेल्या नमुन्यात एस-जीन नसणं हे ओमिक्रॉन प्रकाराच्या शक्यतेचे संकेत आहे. एस-जीन टार्गेट फेल्युअर (SGTF) चाचणी म्हणून ओळखली जाणारी आणि व्हेरिएंट लवकर शोधण्यात मदत करते. जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल येण्याआधी याचा निकाल कळतो.

जीनोम सिक्वेन्सिंगच्या निकालांना सुमारे चार ते पाच दिवस लागतात. चाचणी सुरू करण्यासाठी मशीनला जवळजवळ ३५० नमुने आवश्यक आहेत, असे प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानं वर्णनात नमूद केलं आहे.

BMC अधिकाऱ्यानं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, Omicron प्रकाराच्या बाबतीत, RT-PCR चाचणीद्वारे एस-जीनची अनुपस्थिती कशी शोधली जाऊ शकते? हे स्पष्ट केलं. हे नेहमीच संशयित ओमिक्रॉन प्रकरणावर त्वरित तपशील प्रदान करण्यात मदत करते.

अधिकाऱ्यानं  हे देखील स्पष्ट केलं की, ओमिक्रॉनच्या पुष्टीकरणासाठी, नंतर नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे, एस-जीन शोधण्यात मदत करणाऱ्या RT-PCR चाचण्या त्यांना त्वरित सावधगिरीचे उपाय करण्यास सक्षम करतील.

याव्यतिरिक्त, कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात, प्रशासकिय संस्थेनं आपत्कालीन वापरासाठी एस-जीन शोधण्यासाठी जवळपास ८५० किट आधीच खरेदी केल्या आहेत. परंतु, मोठ्या प्रमाणावर चाचणीसाठी, आणखी किट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे निविदा मागवल्या जातील, असा दावा पालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्यानं केला आहे.

आत्तापर्यंत, महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटची १० रुग्ण सापडले आहेत. प्रशासकिय संस्थेद्वारे वापरल्या जाणार्‍या RT-PCR चाचणीची किंमत २५० रुपये आहे. तर S-gene RT-PCR ची किंमत ३५० आहे.



हेही वाचा

ओमिक्रॉन वेगानं पसरणारा व्हॅरिएंट, पण... - WHO

ओमिक्रॉनचा धोका 'असा' टाळता येईल, आफ्रिकेतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा