Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

कोरोनाच्या वैद्यकीय तपासण्या कस्तुरबा रुग्णालयात होणार

कोरोना विषाणू (corona virus) च्या संदर्भातील वैद्यकीय तपासण्या लवकरच कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) सुरू करण्यात येणार आहेत. दोन आठवड्यांत या तपासण्या सुरू होतील.

कोरोनाच्या वैद्यकीय तपासण्या कस्तुरबा रुग्णालयात होणार
SHARES

कोरोना विषाणू (corona virus) च्या संदर्भातील वैद्यकीय तपासण्या लवकरच कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) सुरू करण्यात येणार आहेत. दोन आठवड्यांत या तपासण्या सुरू होतील. याशिवाय देशातील इतर महत्त्वाच्या केंद्रांमध्येही या तपासण्या सुरू करण्यात येणार आहेत.

चीन (china) मध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू  (corona virus) ने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे भारतामध्ये करोना विषाणूच्या वैद्यकीय निदान चाचण्यांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी कस्तुरबा रुग्णालयाची गेल्या आठवड्यात पाहणी केली. चीनहून आलेल्या काही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये (Kasturba Hospital) देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयाखेरीज बेंगळुरू येथील व्हिक्टोरिया रुग्णालय, दिल्लीमधील एम्स, एनसीडीसी, केरळमधील एनआयव्ही, कोलकाता येथील एनआईसीईडी, लखनऊ येथील केजीएमयू, जयपूरमधील एसएमएस, नागपूरमधील आईजीजीएमसी येथेही कोरोना विषाणूचे नमुने तपासले जाणार आहेत.

कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)  आत्तापर्यंत ८ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांना घरी सोडले आहे.  राज्यात ४ ठिकाणी रुग्णालयांत विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या १७ प्रवाशांपैकी १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे येथे शनिवारी रात्री दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सध्या मुंबई येथे २, तर पुणे येथे ३ जण रुग्णालयात आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आत्तापर्यंत ६४३२ इतके प्रवासी तपासण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.



हेही वाचा  -

मोबाइलवरून करता येणार पाण्याच्या मीटरचं रिडींग

मंगळवारी पालिका सादर करणार अर्थसंकल्प

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा