Advertisement

एमजी मोटर कर्मचाऱ्यांना स्व: खर्चाने देणार कोरोनावरील लस

एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्याचं ठरवलं आहे.

एमजी मोटर कर्मचाऱ्यांना स्व: खर्चाने देणार कोरोनावरील लस
SHARES

सध्या एका बाजूला कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतलेला असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यादृष्टीने देशभरातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. सोबतच लसीकरणाच्या माेहिमेत सहभागी होण्यासाठीही आवाहन केलं जात आहे. हे पाहता एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्याचं ठरवलं आहे.

कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी एमजी मोटर इंडियाने पुढाकार घेतला आहे. एवढंच नाही, तर या लसीकरणाचा सर्व खर्च कंपनी उचलणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. लसीकरणाची ही मोहीम कंपनीच्या सध्याच्या वैद्यकीय विमा पॉलिसी व्यतिरिक्त असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कंपनीकडून करण्यात येणारं कोरोना (covid19) प्रतिबंधात्म लसीकरण हे कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांना या मोफत लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोबतच एमजी मोटर इंडियाचे सर्व डीलर्स, पार्टनर्स व ठेकेदार तसंच विक्रेत्यांना लसीकरणासाठी एमजीकडून आवाहन करण्यात येत आहे.

लसीकरण मोहीम राबवण्यासाठी एमजी गुरुग्राम व हलोल येथील प्रकल्प तसंच प्रादेशिक कार्यालयांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत मोहीम राबवेल. कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कंपनीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा नियम अधिक कठोर केले आहेत.

एमजी मोटर इंडियाप्रमाणेच देशातील इतर आस्थापनांनी देखील पुढाकार घेऊन आपापल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असं देखील आवाहन करण्यात येत आहे.

(MG motor india starts covid 19 vaccination campaign for all employees)


हेही वाचा-

चिंताजनक! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा