Advertisement

मरोळमधील दूधवाल्याला कोरोनाची लागण, परिसर सील

मुंबईतील दूधवाल्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मरोळमधील दूधवाल्याला कोरोनाची लागण, परिसर सील
SHARES

मुंबईतील दूधवाल्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दूधवाला मरोळ पाइप लाइनमधील एका झोपडपट्टीत राहतो. आता मरोळ पाइप लाइन परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत आहेत.

 दूधवाल्याला ताप आल्यानंतर घशात खवखव होऊ लागले होते. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.  त्यानंतर दूधवाला राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. त्याचे कुटुंबीय आणि तो राहत असलेल्या चाळीतील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.  त्यांच्या तपासण्याही सुरू आहेत. हा दूधवाला १४ दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात आला होता याची माहिती घेण्यात येत आहे. त्या सर्वांचीही तपासणी करण्यात येणार आहे. मोरोळ पाइपलाइन झोपडपट्टीत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिका प्रशासानाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा २९१६ वर गेली असून राज्यातील मृतांचा आकडा १८७ वर गेला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १७५६ वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

Coronavirus Updates: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीला परवानगी

लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा