Advertisement

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा रविवारी नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भुजबळही उपस्थित होते.

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
SHARES

राज्यातील अनेक नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भुजबळ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा रविवारी नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भुजबळही उपस्थित होते. लग्न सोहळा पार पडून 24 तासही उलटले नाहीत. तोपर्यंतच भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 भुजबळ यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा.

याधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 



हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा