Advertisement

एमएमआरडीएचं विलगीकरण केंद्र १६ मे रोजी सुरू

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णांसाठी खाटांची संख्याही अपुरी पडणार आहे. त्यामुळे खाटांची संख्या वाढवण्यावर मुंबई महापालिकेचा भर आहे.

एमएमआरडीएचं विलगीकरण केंद्र १६ मे रोजी सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णांसाठी खाटांची संख्याही अपुरी पडणार आहे.  त्यामुळे खाटांची संख्या वाढवण्यावर मुंबई महापालिकेचा भर आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १०४० खाटांची क्षमता असलेलं विलगीकरण केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे. हे विलगीकरण केंद्र १६ मे रोजी सेवेत दाखल होणार आहे.

अवघ्या १५ दिवसात एमएमआरडीने हे केंद्र उभारलं आहे. आतापर्यंत या केंद्रातील स्थापत्य कामे १०० टक्के पूर्ण झाली आहे.१५ मेपर्यंत विद्युतजोडणी व उर्वरित बारीकसारीक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. एमएमआरडीएतर्फे ३० एप्रिल रोजी तातडीने वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) १०४० खाटांचे विलगीकरण केंद्राच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले. या केंद्राच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आली असली तरी, आगामी पावसाळ्याचा विचार करून या केंद्राची बांधणी करण्यात येत आहे.

या केंद्रात विलगीकरणाची गरज असलेले, तसंच अत्यवस्थ नसणाऱ्या रुग्णांना ठेवलं जाणार आहे. सध्या या केंद्रातील स्थापत्यकामे, शौचालय तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत. केवळ विद्युतजोडणी, वायरिंग आदी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.  मुख्य विलगीकरण कक्ष, तपासणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तर अंतर्गत क्युबिकल तयार करण्याचे काम सुरू आहे. या केंद्रांच्या उभारणीसाठी ज्युपिटर रुग्णालयाचे सहकार्य लाभले असून, काम पूर्ण झाल्यानंतर हे केंद्र पालिकेला हस्तांतरित केले जाईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा