Advertisement

ठाण्यात फिरते लसीकरण केंद्र सुरू

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणं त्रासदायक होत असल्याचं दिसून आलं आहे.

SHARES

ठाणे (thane) शहरात आता महापालिकेने फिरते लसीकरण केंद्र (Mobile vaccination center) सुरू केलं आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी, कोणताही नागरिक लसीपासून वंचित राहू नये यासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून  कोपरी (kopri) येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण वसाहतीतील नागरिकांना लस (vaccine) देण्यात आली. 

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणं त्रासदायक होत असल्याचं दिसून आलं आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने अनेक तास रांगेत रहावं लागत आहे. तसंच अनेक नागरिकांकडे ओळखपत्र उपलब्ध नसल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वंचित राहत होते. ही अडचण दूर करण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती. यानुसार पालिकेने फिरते लसीकरण केंद्र सुरू केले.  

या फिरते लसीकरण केंद्रामार्फत कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये ६० वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. तसंच कुष्ठरुग्णांना विशेष दिव्यांग म्हणून मान्यता असल्याने येथील ४५ वर्षांवरील नागरिकांनासुद्धा लस देण्यात आली. 

पालिकेच्या या लसीकरण मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विशेष व्यक्तींनी सहभागी व्हावे. तसंच काही व्याधींनी अंथरुणावर असलेल्या व्यक्तींचे त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन महापौरांनी केलं आहे.  



हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा