Advertisement

मंगळवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या बाराशेहून अधिक

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या बाराशेहून अधिक
SHARES

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 1242 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 74 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईमध्ये सध्या 5974 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.070% टक्के इतका आहे.

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5974 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 562 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1310 सक्रीय रुग्ण आहेत.

अहमदनगर 12, रायगड 228, पालघर 148, रत्नागिरी 17, नागपूर 53, चंद्रपूर 13 आणि नाशिकमध्ये 36 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.



हेही वाचा

लवकरच मास्क घालणे अनिवार्य करणार: आदित्य ठाकरे

COVID-19 चौथी लाट, १ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्रता अधिक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा