Advertisement

म्युकरमायकोसेसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे ७ हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.

म्युकरमायकोसेसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
SHARES

कोरोनानंतर आणखी एक संकट महाराष्ट्रावर घोंघावत आहे. त्यापैकी एक म्हणजे म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजे ब्लॅक फंगस (Black Fungus). कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे ७ हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. २०० पेक्षा जास्त रुग्णांचा या आजारानं जीव घेतला आहे. या आजाराचे एकूण ७ हजार २५० रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे महाराष्ट्रातच झाले आहेत.

त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये १ हजार १६३ रुग्ण आणि ६३ मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्ये रुग्ण आणि ३१ मृत्यू आहेत. इतर राज्यातही काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

कोरोनाचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात होते. आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातच असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत.

पुण्यात म्युकरमायकोसिसचे २७३ रुग्ण आहेत. त्यानंततर नागपुरमध्ये १४८ रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये ६७ रुग्ण आहेत. नांदेडमध्ये ६०, चंद्रपुरात ४८, लातूर २८ तर ठाण्यात २२ रुग्ण आहेत.

राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकोरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



हेही वाचा

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत २३ रुग्ण

अंबरनाथमध्ये लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा