Advertisement

मुंबईतील 348 दवाखाने बंद होणार, महापालिकेची कारवाई

मुंबई कोरोना रुग्णांचं हाॅटस्पाॅट झालं आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील अनेक दवाखाने बंद होते. हे दवाखाने चालू करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता.

मुंबईतील 348 दवाखाने बंद होणार, महापालिकेची कारवाई
SHARES
मुंबई कोरोना रुग्णांचं हाॅटस्पाॅट झालं आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील अनेक दवाखाने बंद होते. हे दवाखाने चालू करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. त्यानंतर अनेक दवाखाने सुरू झाले. मात्र, अजूनही काही दवाखाने बंद होते. अशा 348 दवाखाने बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.      


मुंबईत रोजच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मोठ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  या काळात स्थानिक दवाखाने बंद असल्याने इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक्स सुरू ठेवावे असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं होतं. मात्र अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले. त्यानंतर महापालिकेने पाहणी करत 348 दवाखाने बंद करून त्यांचं रजिस्ट्रेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात असलेल्या एकूण नोंदणीकृत दवाखान्यांपैकी बंद करणार असलेल्या दवाखान्यांची संख्या 25 टक्के आहे. मुंबईतील नर्सिंग होम्स आणि दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा मुंबई  महापालिकेने मागील शुक्रवारी दिला होता. त्यानंतर सोमवापासून मुंबईतील ७५ टक्के दवाखाने सुरू झाले आहेत. मात्र, २५ टक्के दवाखाने अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने त्यांच्यावर कारवाई केली आहे. हे दवाखाने बंद करत त्यांचं रजिस्ट्रेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा