Advertisement

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष रणनिती

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २१४ झाली आहे. तर आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीला कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष रणनिती तयार केली आहे.

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष रणनिती
SHARES

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २१४ झाली आहे. तर आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीला कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष रणनिती तयार केली आहे. यानुसार,  कोरोनाचे रुग्ण असलेले धारावीतील एरिया निश्चित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पालिकेच्या रणनितीनुसार, धारावीतील निश्चित केलेल्या विभागांमध्ये टेस्टिंगची संख्या वाढवणं, स्क्रीनिंगचं प्रमाण वाढवणं, कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष्य केंद्रीत करणं, सॅनिटायझेशन करणं, लॉकडाऊनच्या नियमांचं कठोरपणे पालन करणं आणि क्वॉरंटाइन सेंटरमधील खाटांची संख्या वाढवणं आदी गोष्टींचा समावेश आहे. धारावीतील मुकुंद नगर, मदिना नगर, मुस्लिम नगर, कल्याणवाडी आणि सोशल नगर या पाच भागांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.

धारावीची लोकसंख्या ८ लाख आहे. त्यापैकी सवा लाख लोक या पाच एरियात राहतात. धारावीतील ७० टक्के रुग्ण याच पाच एरियात आहेत. त्यामुळे हे पाचही विभाग सॅनिटाइज करण्यात येणार आहेत. या विभागात काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. या पाचही विभागातील सर्वांचीच टेस्ट होणार आहे. सध्या धारावीत १२०० लोकांना क्वॉरंटाइन करण्याची व्यवस्था आहे. ही संख्या दोन हजारावर नेण्यात येणार आहे. 



हेही वाचा -  

वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा