Advertisement

'त्या' रुग्णांना 5 दिवसांत घरी पाठवणार

कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचं प्रमाण मुंबईत मोठे आहे.

'त्या' रुग्णांना 5 दिवसांत घरी पाठवणार
SHARES

कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचं प्रमाण मुंबईत
मोठे आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांपर्यंत रुग्णालय, विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यापेक्षा पहिले पाच दिवस वैद्यकीय निगराणीखाली ठेवून घरी पाठवण्यात येणार आहे. पालिकेने स्टेप डाउन पॉलिसी तयार केली आहे. यानुसार अशा रुग्णांना घरी जाताना त्यांच्या हातावर पुढील किती दिवस घरात राहायचे आहे, याचा शिक्का हातावर मारण्यात येणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला घरी गेल्यानंतर विलगीकरणाची मुदत संपेपर्यंत घरामध्ये राहावे लागणार आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उशिरा वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचही प्रमाणही मोठं आहे. अत्यवस्थ अवस्थेमध्ये असलेल्या या रुग्णांना तातडीने दाखल करून घेण्याची गरज असते. तर दुसरीकडे लक्षणे दिसत नसलेल्या मात्र करोना पॉझिटिव्ह असलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रकृती खराब झालेल्या स्थितीमध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला माघारी पाठवावे लागू नये, लक्षणे असलेल्या वा संपर्कात आलेल्या व्यक्तीलाही तातडीने विलगीकरणाची सुविधा मिळावी यासाठी या प्रकारे 'अर्ली स्टेप डाऊन पॉलिसी'च्या दृष्टीने विचार सुरू आहे. 

यामध्ये लक्षणे दिसत नसलेल्या तसेच सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांचे
विलगीकरण केले असेल तर पाच दिवसांनी त्यांना घरी पाठवण्याच्या दृष्टीने
विचार सुरू आहे. घरी जाताना त्यांच्या हातावर पुढील किती दिवस घरात राहायचे
आहे, याचा शिक्का हातावर मारण्यात येणार आहे. मात्र मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकाराचा त्रास तसेच इतर कोणत्याही प्रकारची व्याधी असलेल्या रुग्णांच्या संदर्भात हे धोरण अवलंबण्यात येणार नाही.


हे आहेत निकष

- रुग्णाला तीन दिवस ताप नसावा
- रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा अधिक हवी
- एक्स रे मध्ये विशिष्ट प्रकारची संसर्गाशी संबधित पूर्वीची लक्षणे दिसू नयेत
- जर दुसरी स्वॅब चाचणी घेतल्यास ती निगेटिव्ह असावी
- चौदा दिवस पूर्ण होईपर्यंत या रुग्णांनी घरी थांबावे, त्यादृष्टीने त्यांच्या हातावर शिक्का      मारण्यात येईल


हेही वाचा -

सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा