Advertisement

मोबाईल वापरताना ही काळजी घ्या, अन्यथा कर्करोग होऊ शकतो!


मोबाईल वापरताना ही काळजी घ्या, अन्यथा कर्करोग होऊ शकतो!
SHARES

मोबाईलचा थोडा वेळ जरी बंद झाला, तरी अवघे जगच थांबले आहे की काय? असंच आपल्याला वाटायला लागतं. पण, तुम्हाला माहीत आहे का? की मोबाईल आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे ते? मोबाईलमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर सध्या जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे.

परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात दोन दिवसीय किशोरवयीन आणि तरुणांमधील कर्करोग (टायकॉन 2017) या विषयावर सहावी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मोबाईलमुळे ब्रेनट्युमर होऊ शकतो का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर डॉक्टरांनी मोबाईलचा अतिवापर टाळणंच आरोग्यासाठी हितकारक असल्याचा सल्ला दिला.

मोबाईलमुळे ब्रेन ट्युमर होतो, हे अजून सिद्ध झालेले नाही. मात्र, काही संशोधनानुसार असे लक्षात आले आहे, की मोबाईलच्या अतिरिक्त वापराने दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.

- डॉ. वानी संतोष, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्सेसच्या न्यूरो ऑन्कोलॉजी लॅबचे अधिकारी प्रभारी

या परिषदेत संपूर्ण भारतातील कॅन्सरतज्ज्ञ सहभागी झाले होते. साधारणपणे सर्वसामान्य प्रकारचे कर्करोग किशोरवयीन आणि तरुणपिढीत 7 ते 10 टक्के प्रमाणात आढळतात. मात्र, रक्ताचा कर्करोग या वयोगटांत होण्याचे प्रमाण जवळपास 20 टक्के आहे. त्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका किशोरवयीन आणि तरुणपिढीत वाढतो आहे, असे निरीक्षण टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. प्रा. तुषार व्होरा यांनी स्पष्ट केले.

ब्रेनट्युमर, ओव्हेरियन कर्करोग, फुप्फुस, छातीचा कर्करोग, डोकं किंवा मानेचा कर्करोगही या वयोगटात दिसून येतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या परिवाराने, नातेवाईकांनी त्यांच्यासोबत राहणे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

डॉ. प्रा. तुषार व्होरा, टाटा मेमोरिअल रुग्णालय

याविषयी, टाटा रुग्णालयातील प्राध्यापक आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राकेश जलाली सांगतात की, आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत. ही लहान मुले, तरुण आणि प्रौढ व्यक्ती अधिक प्रमाणात गॅझेट्सवर अवलंबून असतात. कमी रेडिएशन पसरवणारे मोबाईल बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. मात्र, तरीही मोबाईलच्या वापराविषयी काही टीप्स पाळल्या पाहिजेत.


मोबाईल वापरताना काय काळजी घ्याल?

  • 5 ते 6 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर करू नका
  • मोबाईलची रेंज कमी असल्यास मोबाईलचा वापर करू नका
  • कान ओले असतील, तर मोबाईलचा वापर करू नका
  • कानाच्या जवळ जास्त वेळ फोन लावून ठेवू नका

या परिषदेत मोबाईलमुळे होणाऱ्या आजारांसंबंधी लोकांच्या मनात असणारी भीती, त्यासंबंधीचे उपचार याविषयी चर्चा करण्यात आली.


हेही वाचा - 

मोबाईल चार्जिंगला असताना उचलू नका, नाहीतर तुमच्याही जीवाला धोका! कसा? ते वाचा...

एका मोबाईलने वाचवला जीव!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा