Advertisement

बापरे! वडाळा, मुलुंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १०० टक्क्यांनी वाढली

एफ / एन (वडाळा-माटुंगा) आणि टी (मुलुंड) वॉर्डात कोरोना रुग्णांची 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे.

बापरे! वडाळा, मुलुंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १०० टक्क्यांनी वाढली
SHARES

मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या आठवड्यात सरासरी 27 टक्क्याने टक्क्यांनी वाढली असल्याचं दिसून आलं आहे.  एफ / एन (वडाळा-माटुंगा) आणि टी (मुलुंड) वॉर्डात कोरोना रुग्णांची 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,  5 मे पर्यंत एफ / एन प्रभागात 48 कंटेनमेंट झोन होते, ते आता वाढून 116 झाले आहेत. त्याचप्रमाणे टी वॉर्डात 14 कंटेनमेंट झोन होते, ते आता वाढून 29 झाले आहेत. सध्या मुंबईत 2643  कंटेनमेंट झोन आहेत. 5 मे रोजी शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या 2083 होती.

कंटेनमेंट झोनची सर्वाधिक संख्या एल वॉर्ड (कुर्ला) मध्ये असून तेथे 278  कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी 81 टक्के भाग गर्दीचा आहे.  जी / एन वॉर्ड (दादर) मध्ये 273 कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी 155 गर्दीची ठिकाणं आहेत. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आणि देवनार या भागांचा समावेश असलेल्या एम / ई आणि एम / डब्ल्यू प्रभागांमध्ये कंटेनमेंट झोनची संख्या अनुक्रमे 20 आणि  24 टक्क्यांनी घटली आहे.

मुंबईची 25 टक्के लोकसंख्या सध्या कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील 24 वाॅर्डपैकी 17 वाॅर्डमधील गर्दीची 50 टक्के ठिकाणं महापालिकेने निश्चीत केली आहेत. या ठिकाणी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करणे कठीण आहे. 



हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा