Advertisement

मुंबई विद्यापीठ गरजूंना देतंय दोन वेळचं जेवण

मुंबई विद्यापीठानं आता एक कम्युनिटी किचनची स्थापना केली आहे. जिथं ते गरजू आणि कामगारांना दोन वेळा जेवण उपलब्ध करुन देत आहेत..

मुंबई विद्यापीठ गरजूंना देतंय दोन वेळचं जेवण
SHARES

कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे बर्‍याच लोकांना अन्न किंवा योग्य निवारा मिळाला नाही. हे लक्षात घेऊन, देशभरातील अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. अनेक संस्थांनी कॅन्टीन किंवा अन्न वितरण शिबिरांची स्थापना केली आहे.

मुंबई विद्यापीठानं आता एक कम्युनिटी किचनची स्थापना केली आहे. जिथं ते गरजू आणि सांताक्रूझमधील कलिना कॅम्पस जवळील कामगारांना दोन वेळचं जेवण उपलब्ध करुन देत आहेत. मुंबई विद्यापीठा तर्फे ५०० मजुरांना दिवसाला दोन वेळचं जेवण वाटप केलं जातं. विद्यापीठानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सध्या परप्रांतीय कामगार अडकले आहेत.

मुंबई विद्यापीठाला चिनारी शक्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं पाठिंबा दर्शवला आहे. तेल, मसाले, फूड पॅकेट्स आणि इतर काही साहित्य खरेदीस या संस्थेनं मदत केली.

देशभरातील राज्य सरकारांनी वंचितांना काही प्रमाणात मोफत रेशन किंवा जेवण देण्याची सोय केली आहे. मात्र, अजूनही काही लोकं आहेत ज्यांना मोफत रेशन आणि जेवण उपलब्ध होत नाही आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी संस्थेनं अनेक उपक्रम राबवले आहेत. अशा उपक्रमामुळे मजूर आणि कामगारांना मदत होऊ शकेल.

लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थ व्यवस्थेवरही झाला आहे. अनेकांना त्यांचा पगार मिळाला नाही. सर्वात जास्त हाल रोजनदारीवर काम करणाऱया मजूरांचे झाले आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी मदतीचा हात पुढे करावा. मुंबई रोटी बँक ( Mumbai Roti Bank) सारख्या संस्थांना देखील तुम्ही देणगी देऊ शकता. य़ाशिवाय झोमेटोचा देखील प्राय आहे. झोमेटोनं जेवण पुरवण्यासाठी फिडिंग इंडिया (Feeding India) बरोबर भागीदारी केली आहे.

 


हेही वाचा

भाटिया हॉस्पिटलच्या आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबईतील 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा