नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाने देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांच्या यादीत पाचवं स्थान पटकावलं आहे. तर सार्वजनिक दंत महाविद्यालयांच्या यादीत तिसऱ्या तर अन्य एका सर्वेक्षणात नायर महाविद्यालय सहाव्या क्रमांकांवर आहे.
देशभरातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करून त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदा तीन वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली. ‘ तीन नामांकित साप्ताहिकांच्या पुढाकाराने हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
द वीक साप्ताहिकाने देशपातळीवरील केलेल्या सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला पाचवा क्रमांक दिला आहे. इंडिया टुडे साप्ताहिकाने केलेल्या दंत महाविद्यालय व रुग्णालयांच्या सर्वस्तरीय सर्वेक्षणात नायर दंत महाविद्यालयाने देशभरात सहावा क्रमांक पटकावला आहे.
आउटलुकने केलेल्या देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीच्या मूल्यमापनविषयक सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यलयाने शासकीय महाविद्यलय गटामध्ये तिसरे स्थान पटकाविले आहे.