Advertisement

आई दवाखान्यात मात्र, ते कोरोनाशी लढतायेत, राजेश टोपेंचं राष्ट्रवादीकडून कौतुक

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आई आजारी असतानाही ते सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

आई दवाखान्यात मात्र, ते कोरोनाशी लढतायेत, राजेश टोपेंचं राष्ट्रवादीकडून कौतुक
SHARES

भारतामध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९च्या घरात गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकानं १४४ची घोषणा केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.


टोपेंचं कौतुक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोपे यांच्या मुलाखतीला व्हिडीओ ट्विट करून त्यांना कौतुकाची थाप दिलीय. टोपे यांच्या आईंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशाही परिस्थितीत महाराष्ट्राचा हा लढवय्या कोरोनाशी लढतो आहे, असं कौतुक जयंत पाटील यांनी केलं आहे.

"टोपे अहोरात्र झटतायेत"

ट्विटमध्ये जयंत पाटील म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारनं कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्यानं टोपे अहोरात्र झटतायेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या शरद पवारांच्या शिलेदाराला सलाम, जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठं आहे पण त्यावर मात करू.


काय म्हणाले टोपे?

जयंत पाटील यांच्या कौतुकाला टोपे यांनीही उत्तर दिलं आहे. सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, आपण जी कौतुकाची थाप दिली त्यामुळे मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. 'Work is worship' या उक्तीप्रमाणे कार्य करत राहणार. आदरणीय पवार साहेब, खा.सुप्रियाताई, ना.अजितदादा आणि आपल्या सारखे ज्येष्ठ सहकारी यांचा आभारी आहे.

टोपेंची आई आजारी

राजेश टोपे यांची आई मुंबईतील एका रुग्णालयात गेल्या २० दिवसांपासून उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राज्यावर करोनाचं मोठं संकट आहे. अशा स्थितीत आपण फार काळ माझ्या आईसोबतही राहू शकत नाही, अशी खंत त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.


कोरोनाबाधित रुग्णात वाढ

दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवत वाढत आहे. रविवारी ७५ वर असणारा आकडा सोमवारी ८९ वर गेला. यावरून परस्थिती चिंताजनक होत असल्याचं कळून येतंय. रुग्णांची वाढती संख्या पाहता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीनं वैद्यकीय शिक्षण विभागानं डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्यानं मान्यता देण्याची विनंती केली होती.


चाचणी केंद्रात वाढ

मुंबईसह पुण्यात कोरोना तपासण्यांची क्षमता लवकरच १०० हून २२०० करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहाणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा