Advertisement

चिंतादायक, मुंबईत सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण

बुधवारी देखील मुंबईत आणखी एक ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे.

चिंतादायक, मुंबईत सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे आणखी ४ नवीन रुग्ण बुधवारी सापडले आहेत. यापैकी उस्मानाबादमध्ये दोन तर मुंबई आणि बुलडाणा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. अशाप्रकारे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.

तर, देशात नव्या व्हेरिएंटचे एकूण प्रकरणे ६८ वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चिंतेमध्ये अधिक भर पडली आहे.

उस्मानाबादेत २ रुग्ण सापडले आहेत. हे दोघे संयुक्त अरब अमिरात इथून उस्मानाबादच्या बावी इथं आले होते. त्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिनोम सीक्वेन्सिंग करण्यात आली. त्याचाच बुधवारी निकाल समोर आला. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्यासोबत आणखी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचा जिनोम सीक्वेन्सिंगचा अहवाल अद्याप आलेला नाही.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ जणांना ओमायक्रन व्हेरिएंटची लागण झाली आहे. यामध्ये मुंबईत १३, पिंपरी चिंचवड इथं १०, पुणे आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ तर कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई विरार आणि बुलडाणा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.हेही वाचा

सलमान खान कुटुंबीयं चिंतेत, घरातील छोटा सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड पार्टीत असलेल्यांच्या संपर्कातील ११० जणांची चाचणी नकारात्मक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा