Advertisement

वरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही

पहिल्या लाटेत कोरोनाने मुंबई (mumbai) तील झोपडपट्टी (slum) भागात शिरकाव केला. यावेळी धारावी, वरळी कोळीवाडा (Worli-Koliwada) कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते.

वरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही
SHARES

कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावी (dharavi) झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता वरळी कोळीवाडाही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मागील १४ दिवसांत वरळी कोळीवाड्यात (Worli-Koliwada) एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे  येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाने मुंबई (mumbai) तील झोपडपट्टी (slum) भागात शिरकाव केला. यावेळी धारावी, वरळी कोळीवाडा (Worli-Koliwada) कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. त्यानंतर फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा धारावी व वरळीतही कोरोनाचे रुग्ण सापडले होते. 

दुसऱ्या लाटेत धारावी पॅटन (dharavi patern) यशस्वी ठरला. मात्र, त्या तुलनेत वरळी कोळीवाडा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र आता दुसरी लाटही आटोक्यात येत आहे.

पालिकेने घरोघरी सर्वेक्षण, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, चाचण्यांचा वाढवलेला वेग, रुग्णांचा शोध घेऊन तात्काळ क्वारंटाईन तसेच प्रभावी उपाययोजना केल्यामुळे धारावी आणि वरळी कोळीवाडा या दोन्ही भागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले. चार दिवसांपूर्वी धारावीतील रुग्णसंख्या सलग दोन दिवस शून्यावर आली होती. त्यानंतरही दोन ते तीन रुग्ण सापडत आहेत. मात्र, वरळी कोळीवाडय़ात मागील दहा दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे वरळी कोळीवाडा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.  

नेहमीच गजबजलेला आणि माणसांची वर्दळ असलेल्या वरळी कोळीवाड्यातून आतापर्यंत १०९९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०२७ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत सोमवारी ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत एकूण रुग्णांची संख्या सात लाख २१ हजारांपुढे गेली आहे. तर मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०५ झाली आहे. एका दिवसात ६५८ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सात लाख ८९ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १४ हजार ६३७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ७२० दिवसांवर पोहोचला आहे.हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा