Advertisement

धारावीतील रुग्णसंख्या शून्यावर, पालिकेचा 'हा' पॅर्टन ठरला यशस्वी

मुंबई महापालिका (BMC) आणि धारावीकरांनी हे करून दाखवलं आहे.

धारावीतील रुग्णसंख्या शून्यावर, पालिकेचा 'हा' पॅर्टन ठरला यशस्वी
SHARES

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील (Dharavi) रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. आतापर्यंत सातवेळा धारावीची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मुंबई महापालिका (BMC) आणि धारावीकरांनी हे करून दाखवलं आहे.

एकाच दिवसात एकही रुग्ण न सापडण्याची घटना सर्वात आधी गेल्यावर्षी म्हणजे २५ डिसेंबरला घडली. २५ डिसेंबर २०२० रोजी धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा ठराविक दिवसांनी रुग्णवाढ, कमी-जास्त होत होती. पण गेल्या दोन वर्षात तब्बल ७ वेळा धारावीत एकही रुग्ण आढळला नाही.

दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) म्हणाल्या, “हे मुंबई महापालिकेचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. धारावीकर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करून दाखवलं आहे”

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनानं शिरकाव केला. त्यानंतर धारावी करोनाचा हॉटस्पोट ठरला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेनं धारावी पॅटर्न राबवला आणि पालिकेच्या या पॅटर्नमुळे धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात आली.

कोरोना (coronavirus) उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रिगटाने केलेल्या शिफारशी ४४ व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत. शिफारशी मान्य झाल्याने ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर १२ ऐवजी आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

कोविडसंबंधित बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास मदत होणार आहे. 

जीएसटी परिषदेची ४४ व्या बैठकीत या शिफारस अहवालाला मान्यता देण्यात आली. कोरोनाविरुद्धची लढाई सहज, सोपी, सुसह्य करण्यासाठी कोरोनावरील औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्याची, त्यावरील कर कमी किंवा माफ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मे रोजी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. हेही वाचा

नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा