Advertisement

३० मे पासून धारावीत एकही मृत्यू नाही

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.

३० मे पासून धारावीत एकही मृत्यू नाही
SHARES
Advertisement

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. धारावीत शुक्रवारी फक्त १७ नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे ३० मेपासून आतापर्यंत धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

धारावीत बुधवारी १९ तर गुरुवारी २३ रुग्ण सापडले होते. शुक्रवारी धारावीत १७ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची एकूण संख्या १८८९ झाली आहे. तर दादरमध्ये ७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. दादारमधील कोरोना रुग्णांची संख्या आता ३७४ झाली आहे. माहीममध्येही २४ रुग्ण सापडल्याने माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या ६०६ झाली आहे. धारावी दादर आणि माहीममध्ये शुक्रवारी एकूण ४८ रुग्ण सापडल्याने या तिन्ही भागातील एकूण रुग्णसंख्या २८६९ झाली आहे.

मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे १४४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत  शुक्रवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ४४ हजार ७०४ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ६२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


हेही वाचा -

Coronavirus Pandemic: मुंबईत 1442 नवे रुग्ण, दिवसभरात 48 जणांचा मृत्यू
कोरोनाचा कहर: राज्यात दिवसभरात 139 जणांच्या मृत्यूची नोंद, 2436 नवीन रुग्ण


संबंधित विषय
Advertisement