Advertisement

दिलासादायक! धारावीत २४ तासात एकही रुग्ण नाही

आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया समजला जाणारा धारावी परिसरातून कोरोनाचा नायनाट झाल्याचं म्हटलं जात आहे.

दिलासादायक! धारावीत २४ तासात एकही रुग्ण नाही
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या धारावी (Dharavi, Mumbai) परिसरातून गेल्या २४ तासांत कोरोनाचा (Coronavirus) एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती मिळाली आहे. एकेकाळीधारावी कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचं बोललं जात होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. 

गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे पहिले आठ रुग्ण धारावी परिसरातच आढळले होते. नंतर पाहाता पाहाता धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया समजला जाणारा धारावी परिसरातून कोरोनाचा नायनाट झाला.

धारावी परिसरात गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गेल्या एप्रिलनंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. २.५ वर्गकिलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये ६.५ लाखांहून अधिक लोक वास्तव्य करतात.

धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ७८८ वर पोहोचली होती. सध्या धारावीत १० पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून ते लवकरच बरे होऊन घरी जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



हेही वाचा

कोरोनामुक्त रुग्णांना इतर आजारांचा त्रास; सुरक्षेच्या दृष्टीनं ओपीडीकडं धाव

कोरोनामुळं मानसिक समस्यांमध्ये वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा