Advertisement

“महाराष्ट्रात कोरोना लसीचा कुणालाही साईड इफेक्ट नाही”

आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लशींपैकी कुठल्याही व्यक्तीला या लसीचा साईड इफेक्ट झालेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“महाराष्ट्रात कोरोना लसीचा कुणालाही साईड इफेक्ट नाही”
(File Image)
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लशींपैकी कुठल्याही व्यक्तीला या लसीचा साईड इफेक्ट झालेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशपातळीवर देखील कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सचे अत्यंत किरकोळ प्रकरणं समोर आली आहेत. 

गेल्या वर्षभरात देशभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना (coronavirus) विषाणूला अटकाव घालण्यासाठी अखेर लसीकरणाला सुरूवात झाली आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील १६ जानेवारी २०२१ पासून कोरोनावरील लसीकरणाला सुरूवात झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात एकूण १८४२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे कोवीन ॲप मध्ये दोष निर्माण झाल्यावर सोमवारपर्यंत लसीकरण स्थगित करण्यात आलं. 

हेही वाचा- महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण

परंतु तोपर्यंत लसीकरण करण्यात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला साईड इफेक्ट झाल्याचं आढळून आलं नाही. महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम अत्यंत सुरक्षितरित्या पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी व्यक्त केला. तर देशभरात ४४७ जणांवर लसीचे साईड इफेक्ट्स झाल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनावरील (coronavirus) लस ही पूर्णपणे सुरक्षित असून काही जणांवर अपवादात्मक स्थितीत किरकोळ स्वरूपाचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. लस दिलेल्या भागाला सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, अस्वस्थ वाटणे, शरीराला खाज येणे, घाम फुटणे, चक्कर येणे किंवा ताप येणे, असा किरकोळ त्रास होऊ शकतो. परंतु कुणाच्याही जीविताला या लसीमुळे धोका नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी याआधी दिली होती.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. राज्यातील २८५ केंद्रांवर ६४ टक्के जणांना, तर मुंबईत ५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस देण्यात आली.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा