Advertisement

व्हॉट्सअॅपवरून 'असं' डाऊनलोड करा कोविड १९ वॅक्सिनचं सर्टिफिकेट

१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण यासाठी एकच अट आहे ती म्हणजे तुम्हाला कोरोनाचे डोस घेतल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागले.

व्हॉट्सअॅपवरून 'असं' डाऊनलोड करा कोविड १९ वॅक्सिनचं सर्टिफिकेट
SHARES

नुकतंच कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण यासाठी एकच अट आहे ती म्हणजे तुम्हाला कोरोनाचे डोस घेतल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागले. तुम्ही हे प्रमाणपत्र कोविन पोर्टल (Cowin Portal) आणि आरोग्य सेतू अॅप वरून डाउनलोड करू शकत होता.

आता तुम्ही ते WhatsApp वरून देखील डाउनलोड करू शकता. पण आता प्रश्न असा आहे की ते व्हॉट्सअॅप वरून कसं डाउनलोड केलं जाऊ शकतं? म्हणून आम्ही तुमच्यासाठी उत्तर घेऊन आलो आहोत. व्हॉट्सअॅप वरून कोरोना लस प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी, लस घेणं सर्वात महत्वाचे आहे. जर तुम्ही अद्याप लसीकरण केलं नसेल तर आधी लस घ्या. तथापि, लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करणं फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक ठिकाणी लसीचे प्रमाणपत्र दाखवणं आवश्यक बनले आहे. जर तुम्ही कुठेतरी जात असाल तर तुमच्याकडे लस प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्हचा अहवाल असणं आवश्यक आहे.

अनेक प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहेत जिथून तुम्ही कोविड -१९चे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. तुम्ही कोविड -१९ लस प्रमाणपत्र कोविन अप Cowin-App, आरोग्य सेतू Arogya Setu आणि इतर ठिकाणांवरून डाउनलोड करू शकता. याशिवाय, आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून कोविड -१९ लस प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोविन पोर्टल किंवा अॅपवरून लस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट व्हॉट्सअॅप वरून कसे डाऊनलोड करता येईल ते पाहूया...


'असं' डाऊनलोड करा

  • केंद्र सरकारनं लोकांना मदत करण्यासाठी MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप चॅटबॉक्स सुरू केला आहे. या चॅटबॉक्सचा वापर करून तुम्ही कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
  • MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप नंबर ९०१३१५१५१५ वर मेसेज करू शकता. यासाठी हा नंबर पहिला MyGov नावानं मोबाईलमध्ये सेव्ह करा.
  • आता तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप उघडा आणि सर्च बारमध्ये MyGov नंबर शोधा.
  • आता चॅट विंडो उघडा आणि डायलॉग बॉक्समध्ये डाउनलोड प्रमाणपत्र टाइप करा
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपवरून एक ओटीपी पाठवला जाईल
  • व्हॉट्सअॅप चॅटबॉक्समध्ये मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा
  • ज्याचे प्रमाणपत्र पाहिजे ते टाइप करा
  • यानंतर तुमचे कोविड लस प्रमाणपत्र तुमच्या चॅटबॉक्समध्ये येईल.
  • तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा आणि त्याचं प्रिंटआउट घ्या.
  • १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी, परदेशी जाण्यासाठी तुम्ही हे प्रमाणपत्र वापरू शकता.  हेही वाचा

बीएमसी कर्मचार्‍यांना वैद्यकीय गटविमा लागू

धारावीत आठव्यांदा कोरोना रुग्णसंख्या शून्य

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा