Advertisement

मुंबईच्या वेशीवर ओमिक्रॉन, 'इथं' आढळला पहिला रुग्ण

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेला एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या वेशीवर ओमिक्रॉन, 'इथं' आढळला पहिला रुग्ण
SHARES

डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉन (Omicron live updates) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेला एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. या तरुणानं कोरोनाची लस घेतली नव्हती.

कल्याण-डोंबिवलीमधील एका ३३ वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.

“घाबरण्याचे शून्य टक्केदेखील कारण नाही. या विषाणूचा मृत्युदर खूप कमी आहे. मात्र त्याचा संसर्गदर खूप आहे. डोंबिवलीत आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांचीदेखील चाचणी करावी लागेल. मला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी एखादा व्यक्ती आला तर त्यालादेखील ओमिक्रॉनची लागण होते,” अशी माहिती राजेश टोपे यांनी एका टीव्ही चॅनलला दिली आहे.

डोंबिवलीतील रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. त्याला सौम्य लक्षणे आहेत. अंगदुखी, खोकला, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणे या रुग्णात आहेत. आज आपल्याला संसर्ग टाळायचा आहे. सध्या 28 नमुने ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल दोन ते तीन दिवसांत येतील,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, सुरुवातीला कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली होती. त्यानंतर आज गुजरातमध्येही एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा