Advertisement

‘ऑपरेशन रेडिनस 2017’ - रक्त मिळवणं आता होणार अधिक सोपं!


‘ऑपरेशन रेडिनस 2017’ - रक्त मिळवणं आता होणार अधिक सोपं!
SHARES

आपातकालीन परिस्थिती असो किंवा कोणत्याही ऑपरेशसाठीची अर्जन्सी, रक्तदात्यांची कायमच आवश्यकता असते. आणि वेळीच जर रक्त मिळालं नाही तर रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, रक्तदात्यांची नियोजनबद्ध माहिती एकाच ठिकाणी मिळणं याआधी कठीण होत होतं. आता मात्र 'फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक' या संस्थेने ही जबाबदारी घेतली आहे.

वर्षभर मुंबईतील रुग्णालयांना रक्ताची गरज असते. पण, रक्तदात्यांअभावी हा पुरवठा वेळेत करणे शक्य होत नाही. आधीच मुंबईतील रक्तदानाचे प्रमाण हे 10 टक्क्यांहून कमी आहे. याउलट इतर देशांत रक्तदानाचे प्रमाण 20 ते 40 टक्क्यांच्या घरात आहे. 

केवळ रेकॉर्ड करण्यासाठी रक्तदान शिबीर घेतल्यामुळे बऱ्याचदा रक्ताची साठवण व्यवस्थित केली जात नाही. याची आपल्याला खंत वाटते, अशी प्रतिक्रिया 'फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक' संस्थेच्या अध्यक्षा डॉ. झरीन भरूचा यांनी दिली.

अनेकवेळा रेकॉर्ड करण्यासाठी रक्तदान शिबिरे होतात. त्यात आवश्यकतेहून अधिक रक्त एकाच वेळी जमा होते. त्याचे नियोजनही व्यवस्थित होत नाही. याउलट डेंग्यू, लेप्टो असे साथीचे आजार येताच रक्ताची चणचण भासू लागते. त्यामुळे नेहमी रक्तदान करणाऱ्या दात्यांची माहिती संकलित करून गरज भासेल तेव्हा रक्तपुरवठा करण्यासाठी  ‘ऑपरेशन रेडिनेस 2017’ ही मोहीम सुरू केली आहे.

डॉ. झरीन भरूचा, अध्यक्षा, फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक


फेडरेशनने 2016 मध्ये एवढं रक्त केलं जमा

गेल्या वर्षी फेडरशनने जवळपास 2 लाख 80 हजार युनिट रक्त जमा केलं होतं. याउलट मुंबईकरांकडून 3 लाख युनिटची मागणी होती. हीच परिस्थिती प्लेटलेट्सच्या बाबतीत दिसून आली. 7 हजार युनिट्स प्लेटलेट्सची गरज असतानाही केवळ 6 हजारांच्या आसपास प्लेटलेट्सचा पुरवठा करणे शक्य झाल्याचं फेडरेशनने स्पष्ट केलं.

आतापर्यंत पथदर्शी प्रकल्पामध्ये एक हजार रक्तदात्यांची फेडरेशनने नोंदणी केल्याचे उपाध्यक्ष डॉ. एस. बी. राजाध्यक्ष यांनी सांगितलं. जवळपास 10 हजार रक्तदात्यांची नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्याचा मानस आहे. तीन महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून चारवेळा हे दाते आवश्यकता असेल त्या वेळी रक्तदान करतील. त्यामुळे ठराविक रक्तगटाच्या रुग्णाला हवं त्या वेळी रक्ताचा पुरवठा करणं शक्य होईल. फेडरेशनच्या संकेतस्थळावरून दात्यांना आणि गरजूंना रक्तदान आणि पुरवठा करणाऱ्या पेढ्यांची माहिती मिळू शकेल.

‘रक्तदान केल्याने महिलांचे वजन कमी होते’, ‘रक्तदानामुळे आजार होतात’ अशा विविध अफवांमुळे रक्त संकलन कमी होत असल्याचं फेडरेशनच्या सचिव डॉ. निझारा यांनी सांगितलं. दर 15 दिवसांतून एकदा प्लेटलेट्स देता येतात. एकटा प्लेटलेट्स देणारा दाता रक्ताच्या पिशवीतून निर्माण होणाऱ्या 6 प्लेटलेट्सची बरोबरी करतो. त्यामुळे रक्तदानाबरोबर प्लेटलेट्सदात्यांची संख्याही वाढवण्याचं काम या मोहिमेत केलं जाईल.



हेही वाचा -

हेच खरे ‘दान’शूर!

रक्त घेताय? मग नॅट तपासणी कराच...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा