SHARE

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं प्रिन्स राजभर या २ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. प्रिन्सचा गुरूवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला असून, हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका प्रशासनानं स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, याबाबत प्रशासनानं सादर केलेल्या अहवालानुसार, प्रिन्सचा मृत्यू सेप्टिसेमिशॉक (रक्तातील जंतूसंसर्ग), थर्मल बर्न (भाजल्याने) व एटरियल सेप्टल डिफेक्ट (जन्मजात हृदयरोग) यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

'या' आजारांनी त्रस्त

प्रिन्सला जन्मजात हृदयरोग व अरुंद श्वास नलिकेचा त्रास तसेच न्यूमोनिया हे गंभीर आजार होते. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ईसीजी मशीनमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळं त्याचा उजवा हात, छातीचा काही भाग, खांदा व कान भाजला. या घटनेनंतर प्रिन्सवर उपचार सुरू असताना हाताला गँगरीन पसरू नये म्हणून खांद्यापासून हात कापण्यात आला. एक आठवडा त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र, न्यूमोनिया व सेप्टिमियामुळं त्याची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रकरणाची चौकशी

ईसीजी मशीन आणि गादीचा जळालेला भाग भोईवाडा पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दिला आहे. प्रिन्सच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि आता वैद्यकीय शिक्षण, संशोधन संचालनालयमार्फत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या दुर्घटनेच्या पोलीस व डीएमईआर चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल, असे असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.हेही वाचा -

दुर्दैवी! अखेर २ महिन्यांच्या दुर्घटनाग्रस्त प्रिन्सचा मृत्यू

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणासंबंधित विषय
ताज्या बातम्या