Advertisement

खासगी डॉक्टरांचं बुधवारपासून राज्यव्यापी आंदोलन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वाखाली खासगी डॉक्टर बुधवारी ९ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

खासगी डॉक्टरांचं बुधवारपासून राज्यव्यापी आंदोलन
SHARES

 इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वाखाली खासगी डॉक्टर बुधवारी ९ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. राज्यातील खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. राज्य सरकारकडून कधी खासगी रुग्णालयाचा दर ठरवला जातो, तर कधी रुग्णालयावर कारवाई केली जाते. सरकारच्या या कारभाराविरोधात खासगी डॉक्टर राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

याबाबत आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे म्हणाले की, बुधवारपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यातील आयएमए डॉक्टरांना श्रद्धांजली वाहत आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर १० सप्टेंबरला मुंबईसह राज्यातील विविध सरकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

एका कोरोना रुग्णासाठी मोठा खर्च येत असताना सरकारकडून अन्यायकारक दर खासगी रुग्णालयांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. हे दर निश्चित करताना डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी वा आयएमएशी चर्चा न करता सरकार परस्पर दर ठरवत आहे. तर या अन्यायकारक दराविषयी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तर तो दिला जात नाही, असा आरोप भोंडवे यांनी केला.


हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोधRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा