Advertisement

"माझ्या औषधानं कोरोना बरा होताे", पुणेकर डॉक्टराचा दावा

पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे.

"माझ्या औषधानं कोरोना बरा होताे", पुणेकर डॉक्टराचा दावा
SHARES

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. पुण्यात कोरोनाचा उद्रेक पाहता मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लसीकरणावरही पुण्यात भर दिला जात आहे.

आता पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. हे औषध कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे.

कोरोनावर एका नावानं आयुर्वेदिक औषध डॉ. सारंग फडके यांनी तयार केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना डॉ. फडके हे औषध देत आहेत. हे रुग्ण बरे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच या औषधाबाबत त्यांनी आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

आपण हे औषध आतापर्यंत १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना दिले आहेत. ते १०० टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे. हे औषध १ वर्षांच्या मुलापासून ७८ वर्षांच्या कोरोनाबाधिताला देण्यात आले आहे. डॉ. फडके हे या औषधाला मान्यता मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. पण केंद्रानं अद्याप त्यांची दखल घेतली नाही.

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं फडके यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारनं मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा

अँटीजेन टेस्ट केली तरच एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

"कोरोनाचा १ रुग्ण ४०० जणांना संक्रमित करू शकतो"

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा