Advertisement

घाटकोपर, भांडुपमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर घटला

भांडुप आणि घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एस आणि एन वॉर्डमधील रुग्णवाढीचा दर तब्बल ८ टक्क्यांवर गेला होता.

घाटकोपर, भांडुपमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर घटला
SHARES

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भांडुप आणि घाटकोपरमध्ये आता कोरोना रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांनी घटला आहे. भांडुप आणि घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एस आणि एन वॉर्डमधील रुग्णवाढीचा दर तब्बल ८ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर या परिसरांत अधिकाधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन, घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा वेग वाढवल्याने केवळ आठवडाभरातच येथील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

२८ मे रोजी एस विभागात ८.२ टक्के तर एन विभागात  ८.८ टक्के रुग्णवाढीचा दर नोंदवण्यात आला होता. मात्र ५ जून रोजी हा दर अनुक्रमे ५.४ आणि ४.५ टक्के इतका खाली आला आहे. मागील आठवड्यात विभागनिहाय माहिती जाहीर करण्यात आल्यानंतर एस आणि एन वॉर्डमधील रुग्णवाढीचा दर ८ टक्क्यांवर गेल्याचं दिसून आल्यानंतर पालिकेने अधिक उपाययोजना सुरू केल्या. मागील आठवड्यापासून दोन्ही प्रभागातील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी भांडुप परिसरातील खिंडीपाडा, तानाजी वाडी, पाइपलाइन परिसर तर घाटकोपरमधील कामराज नगर, रमाबाई नगर आदी विभागांमध्ये उपाययोजना वाढवल्या.

दोन्ही प्रभागांमध्ये 'चेस द व्हायरस' हे धोरण अधिक तीव्रतेने राबवण्यात आले.  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित व्यक्तींना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये आणण्यास सुरुवात केली. तसंच  नागरिक सुरक्षित वावर कटाक्षाने पाळतील यासाठी जनजागृती करण्यात आली. त्याशिवाय आरोग्य शिबिरे, फिव्हर कॅम्प, घरोघरी जाऊन तपासणीचा वेग वाढवण्यात आला. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग कमी करण्यात यश मिळालं.



हेही वाचा -

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा