Advertisement

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.२६ टक्क्यांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.२६ टक्क्यांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्क्यांवरून ९६.२६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. घटती रुग्णसंख्या आणि मृत्यू दर कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ५५ हजार ६३४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५३ हजार ५५१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२५० (२.४९ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८३३ रुग्णांवर उपचार सुरू असून त्याचे प्रमाण १.४९ टक्के इतके आहे.

मृत्यूचे प्रमाण २.२४ टक्के आहे. येथील रुग्ण दुपटीचा कालावधी ३९६ दिवसांवर आला आहे. पालिका क्षेत्रात रोज शंभरच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. तर तितकेच रुग्ण रोज बरे होत आहेत. दर आठवड्याला कोरोना रुग्ण वाढीचा वेग ०.२० टक्के आहे.

ठाणे महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून पाच ठिकाणी करोना लसीकरण सराव फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवस ही सराव फेरी सुरू राहणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका प्रशासन लसीकरणाचे नियोजन आखत असून त्यामध्ये प्रशासनाने लसीकरणासाठी ६ लाख ६० हजार जणांची यादी तयार केली आहे. त्यात आरोग्यसेवक, प्रथमस्तरीय कर्मचारी (फ्रंटलाइन वर्कर्स), ५० वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वाचे दोनदा लसीकरण केले जाणार असून या दोन्ही टप्प्यातील लसीकरण १३२ दिवसांमध्येच पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा