Advertisement

रिलायन्स कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत लस!

नीता अंबानी यांनी सर्व रिलायन्स कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक पत्र पाठवलं आहे.

रिलायन्स कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत लस!
SHARES

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि संस्थापक, समाजसेवी नीता अंबानी यांनी सर्व रिलायन्स कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक पत्र पाठवलं आहे. पत्राद्वारे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.

भारत सरकारच्या कोविड लसीकरण मोहिमेत नोंदणी करावी असं आवाहन पत्राद्वारे केलं आहे. नोंदणी करतील त्यांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. कर्मचाऱ्याची बायको, पालक आणि मुल नोंदणी करू शकतात, असं पत्रात म्हटलं आहे.  

पत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणाले की, रिलायन्स कुटुंबाचाच भाग असल्यासारखं आमच्या कुटुंबाचं आरोग्य जपणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे.”

नीता अंबानी पत्रात म्हणाल्या आहेत की, "तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यानं आम्ही लवकरच कोरोनाला हरवू. तोपर्यंत स्वत:ची काळजी घ्या. अत्यंत सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेत रहा. आपण सामूहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवू आणि नक्कीच आपण जिंकू."

यापूर्वी रिलायन्स फॅमिली डे २०२० च्या संदेशात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आश्वासन दिलं होतं की, भारतात कोणतीही मंजूर लस उपलब्ध होताच रिलायन्स सर्व कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणाची योजना आखेल.

सरकारनं आता जगातील सर्वात मोठा COVID 19 लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. त्या हे देखील म्हणाल्या की, "कोरोना हारेगा, इंडिया जीतेगा" असं म्हणत पत्राचा समारोप केला.

आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांपैकी इंफोसिस आणि सॉफ्टवेअर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन कंपन्यांनी सुद्धा अशा स्वरुपाची घोषणा आधीच केली. या कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल.

त्यातील काही लोकांनी लसिकरणाचा पहिला डोस देखील घेतला आहे. यासोबतच, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचारी आणि कुटुंबियांना मोफत लस देत आहेत.


हेही वाचा

अंधेरीतील रेस्टॉरंटमधील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित

आफ्रिका, ब्राझील, युकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी 'या' नव्या गाईडलाईन्स

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा