आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 Sion
आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
See all

सायन - मुक्ती फौज (सॉल्व्हेशन आर्मी) यांच्या वतीने रविवारी एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य शिबिरात बालाजी रुग्णालय तसेच सोमय्या रुग्णालयाच्या 5 निष्णात डॉक्टरांसहित 20 मदतनीसांनी भाग घेतला होता. ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी, थायरॉईड तपासणी, फिजिओथेरिपी, अँजिओ ग्राफी, बायपास सर्जरी, मुतखडा अशा अनेक दुर्धर रोगावर मोफत तपासणी आणि उपचार मिळणार असल्याने शीव परिसरातील 144 पीडितांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रवी राजन यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक रवी राजन यांनी मोफत आरोग्य शिबिरात भाग घेणाऱ्या शेकडो रुग्णांची वैयक्तिक विचारपूस करून डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मुक्ती फौज (सॉल्व्हेशन आर्मी)चे मेजर स्टीफन राज म्हणाले गेल्या दहा वर्षांपासून आम्ही मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहोत. वाढत्या लोकसंख्येमुळे रोग्यांचे प्रमाण वाढले आहे. आज महागाई आणि डॉक्टरांच्या फी मुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

प्रथमतः किरकोळ वाटणारा आजार नंतर जीवघेणा ठरतो हे सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे शीव परिसरातील शेकडो नागरिक मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. या आरोग्य शिबिरात मुक्ती फौज (सॉल्व्हेशन आर्मी) च्या अनेक तरुण जवानांनी भाग घेतला होता.

Loading Comments