Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

मुंबईत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी ६ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

अन्न व औषध प्रशासन खात्यावर असलेला अत्यंत ताण लक्षात घेता मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ६ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी ६ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
SHARES

मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत योग्यरित्या आणि वेळीच कार्यवाही व्हावी, म्हणून मुंबई महापालिकेच्या वतीने ६ समन्वय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येईल. हे समन्वय अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचे कामकाज पाहतील, अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईतील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. 

अन्न व औषध प्रशासन खात्यावर असलेला अत्यंत ताण लक्षात घेता मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ६ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी ४ विभागास १ याप्रमाणे हे समन्वय अधिकारी कामकाज सांभाळतील. तसेच प्रत्येकी ४ विभागास १ याप्रमाणे एकूण ६ ऑक्सिजन पुरवठादार नेमण्यात येतील. 

महानगरपालिकेचे समन्वय अधिकारी हे अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील. खासकरुन ६४ नर्सिंग होममध्ये कोणतीही अडचण उद्भवणार नाही, यासाठी ते समन्वय साधतील. तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा योग्यरित्या व काटकसरीने वापर करण्यासाठी केंद्र शासनाकडून  दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याबाबत या ६४ नर्सिंग होमना सूचना करुन प्रशिक्षित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेचे संचालक करतील. 

आयुक्त चहल म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका, शासकीय आणि खासगी असे मिळून एकूण १५० कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये आजमितीस २० हजार रुग्णशय्या असून येत्या आठवड्यात २२ हजार इतक्या होणार आहेत. मागील १५ दिवसात मुंबईतील कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या ८ ते १० हजार दरम्यान स्थिरावली असली तरी पुढील १५ दिवस आणखी महत्त्वाचे आहेत. रुग्णांची वाढलेली संख्या आणि त्यांना लागणारा ऑक्सिजन पाहता पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत राखणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत असून वाढती रुग्ण संख्या पाहता अधिकची मागणी शासनाकडे केली आहे.हेही वाचा

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा