Advertisement

ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये स्लॅबचा भाग कोसळला


ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये स्लॅबचा भाग कोसळला
SHARES

ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील मॅटर्निटी वॉर्डमध्ये स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झालं नसल्याचं वृत्त आहे.


माता, बालकांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं

प्रसूती झालेल्या महिला आपल्या बाळांसोबत गाढ झोपलेल्या असताना स्लॅबचे तुकडे पडले. मात्र ही दुर्घटना पाहणारे एक गृहस्थ जागीच बेशुद्ध पडले. सध्या या वॉर्डमधील माता आणि बालकांना दुसऱ्या वार्डमध्ये हलवण्यात आलं आहे.


स्थानिक नाराज

ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत असताना पालिका प्रशासन मात्र लक्ष देत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा -

इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा