Advertisement

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण
SHARES

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून या कालावधीत इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली आहे. ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.

संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येतील.  या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणूशी मिळताजुळता आहे का याची माहिती मिळेल.

जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.

२५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरुन भारतात आलेल्या प्रवाशांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या आणि  महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असं आवाहन आरोग्य विभागाने केलं  आहे.



हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा