Advertisement

कल्याण-डोंबिवलीत 'ह्या' ३२ प्रभागांत कडक निर्बंध

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर येथील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

कल्याण-डोंबिवलीत 'ह्या' ३२ प्रभागांत कडक निर्बंध
SHARES
Advertisement

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन ४६५ कोरोना रुग्ण आढळले. येथील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील ३२  प्रभागांमध्ये कडक लाॅकडाऊन लागू केला आहे.  नियम धुडकावणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर येथील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून महापालिका प्रशासनाने शहरातील कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेले ३२ प्रभागात लाॅकडाऊन घोषीत केला आहे. ही ठिकाणं तीव्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. या प्रभागाच्या चारही सीमा पालिका, पोलिसांनी बंद केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास परवानगी नाही. तसंच या ठिकाणी जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात औषध दुकाने, सिलेंडर पुरवठा, रुग्णालय सुरू राहणार आहेत, तर दूध, बेकरी, किराणा, भाजीपाला ही दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. पोलिसांची पथके चौकांमध्ये दुचाकी, चारचाकी, खासगी वाहनांची तपासणी करत आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. अनावश्यक वाहने रस्त्यावर आणणाऱ्यांवर दंड, वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे. 

ह्या प्रभागांत निर्बंध

मांडा, मोहने, गौरीपाडा, चिखलेबाग-मल्हारनगर, गोविंदवाडी, रोहिदासवाडा, जोशीबाग, विजयनगर, आमराई, तिसगाव, दुर्गानगर, कोळसेवाडी, चिकणीपाडा, गणेशपाडी, जरीमरीनगर, शिवाजीनगर, आनंदनगर, चोळेगाव, शिवमार्केट, सावरकर रस्ता, सारस्वत वसाहत, रामनगर, म्हात्रेनगर, तुकारामनगर, सुनीलनगर, गांधीनगर, पिसवली, ठाकूरवाडी, नवागाव, कोपर रस्ता, नांदिवलीतर्फ पंचानंद.हेही वाचा -

वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन

अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही

आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा
संबंधित विषय
Advertisement