Advertisement

मार्च-मे महिन्यात पालिकेनं वाटली १.८४ कोटी फूड पॅकेट्स

पालिकेनं ३० मार्च ते १० मे दरम्यान ४२ दिवसांत या सर्व फूड पॅकेट्सचं वाटप केलं आहे.

मार्च-मे महिन्यात पालिकेनं वाटली १.८४ कोटी फूड पॅकेट्स
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या आकडेवारीनुसार त्यांनी १. ८४ कोटींचे फुड पॅकेट्स वाटप केले. २०११ च्या जनगणनेनुसार फुड पॅकेट्सच्या वाटपाची संख्या शहरातील १.२५ कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. पालिकेनं ३० मार्च ते १० मे दरम्यान ४२ दिवसांत या सर्व फूड पॅकेट्सचं वाटप केलं आहे.

पालिकेनं पहिल्यांदा एका दिवसात १४ हजार ५४० फूड पॅकेटचे वितरण केले. त्यानंतर ३० मार्चपासून फूड पॅकेटची मागणी वाढू लागली. आकडेवारीनुसार, एम-ईस्ट (गोवंडी, मानखुर्द) वॉर्डात २८.६४ ख खाद्य पदार्थांची पाकिटं वाटली गेली. त्यानंतर पी-उत्तर (मालाड) आणि एच-ईस्ट (वांद्रे पूर्व, सांताक्रूझ) इथं २१.०७ लाख आणि १३.२८ लाख खाद्यपदार्थांची पाकिटं वाटली गेली. अधिकाऱ्यांनी पुढे ही माहिती दिली की, स्वयंसेवी संस्था आणि नगरसेवकांच्या मदतीनं गरजूंना खिचडी, पुलाव आणि बिर्याणी असे ३०० ग्रॅम प्रत्येक दिवसाला दोनदा सुमारे ७ लाख पाकिटं वाटली गेली.

गोवंडीचे नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “गोवंडी आणि मानखुर्दमध्ये बहुतेक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या पाकिटांची मागणी वाढली आहे. गोवंडी झोपडपट्टीत बहुतेक वाहन आणि टॅक्सी चालक, रोजंदारीवरील कामगार, मजूर असे अनेक गरजू खाद्य पाकिटांची मागणी करत आहेत. दिवसभरात १२ तास काम केल्यावर देखील आम्हाला अद्याप लोकांकडून अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.” या ठिकाणी राहणारी बहुसंख्य लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. लॉकडाऊनचा परिणाम म्हणजे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या काळात हे फूड पॅकेट्स या लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहेत.

नागरी संस्थेनं दिलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, पश्चिम उपनगरामध्ये सुमारे ४० टक्के खाद्यपदार्थांचे पाकिटं वितरित करण्यात आली. पूर्व उपनगरांत ३१.५८ टक्के आणि मुंबई शहरात २८.४९ टक्के वितरीत करण्यात आली. पहिला लॉकडाऊन १५ एप्रिलपासून वाढवण्यात आल्यानंतर खाद्यपदार्थांच्या पाकिटांच्या मागणीत वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुंबईत क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत ४४१ टक्के वाढ

पालिकेची नवी वर्गवारी, कंटेन्मेंट झोननंतर आता सीलबंद इमारती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा