Advertisement

मुंबईत क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत ४४१ टक्के वाढ

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन केलं जातं. जोपर्यंत त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वॉरंटाइन केलं जातं.

मुंबईत क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत ४४१ टक्के वाढ
SHARES

मागील एका महिन्यात मुंबईत क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ४४१ टक्के वाढ झाली आहे. मुंबईत १५ एप्रिलपर्यंत ४३ हजार २४९ लोक होम क्वॉरंटाइन होते. १३ मेपर्यंत हा आकडा २.३४ लाखावर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.   

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन केलं जातं. जोपर्यंत त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वॉरंटाइन केलं जातं. कोरोनाचे लक्षणं आढळतात अशा लोकांनाही क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवलं जातं. ६ एप्रिलपर्यंत मुंबईत १० हजार ९६८ लोक होम क्वॉरंटाइन होते. ही संख्या १७ एप्रिलपर्यंत ५३ हजार ११८ झाली आहे. होम क्वॉरंटाइन असलेल्या एकूण २.३४ लाख लोकांपैकी १२,६३६ लोकांना

संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तर ९५ हजार १५४ जणांनी त्यांचा १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या मुंबईत एकूण ६६१ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या २ हजार ६०० एवढी होती. महापालिकेने कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करत सील बिल्डिंग ही नवी वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार मुंबईत एकूण १११० सील इमारती आहेत.



हेही वाचा -

अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा... 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा