Advertisement

सप्टेंबरअखेर नायर रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन मशीन सुरू होईल

आता नायर रुग्णालयातील रुग्णांची सिटीस्कॅनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

सप्टेंबरअखेर नायर रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन मशीन सुरू होईल
SHARES

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी सिटीस्कॅन केंद्रात ही चाचणी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र आता नायर रुग्णालयातील रुग्णांची सिटीस्कॅनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सप्टेंबरअखेर नायर रुग्णालयात नवीन सिटीस्कॅन मशीन सुरू होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज साधारणपणे तीन – चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. यामधील काही रुग्णांना डॉक्टर सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देतात. मात्र रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये किंवा खासगी सिटीस्कॅन केंद्रांमध्ये ही चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.

मात्र महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षायादी असल्याने रुग्णांना सिटीस्कॅन चाचणी खासगी केंद्रात करावी लागते. परिणामी, रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो.

नायर रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र रुग्णांचा हा त्रास लवकरच संपणार आहे. नायर रुग्णालयात सप्टेंबरअखेर सीटी स्कॅन मशीन बसवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाने सीटी स्कॅन मशीन खरेदीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून सप्टेंबरअखेर संबंधित कंपनी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन बसवेल, असे नायर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले. यामुळे लवकरच रुग्णांचा त्रास कमी होईल, असेही ते म्हणाले.



हेही वाचा

रोबोटकडून हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया, ५६ वर्षीय व्यक्तीला जीवनदान

मुंबईत डेंग्यु आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा