स्टेण्टचा पुरेसा साठा उपलब्ध-एफडीए

 Mumbai
स्टेण्टचा पुरेसा साठा उपलब्ध-एफडीए

मुंबई - स्टेण्टच्या किमती नियंत्रणात आल्याने स्टेण्टची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका रूग्णांना बसतो आहे. याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने शुक्रवारी मुंबईतील विविध रूग्णालयांत जाऊन स्टेण्टच्या उपलब्धीची माहिती घेतली. त्यानुसार रूग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टेण्टचा साठा असल्याचे स्पष्टीकरण एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे एफडीएने दिले आहे.

तर स्टेण्ट उपलब्ध होत नसेल, स्टेण्टच्या टंचाईचा फटका बसत असेल तर रुग्णांना थेट एफडीएशी संपर्क साधण्याचे आवाहनही एफडीएने केले आहे. त्यानुसार रूग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना स्टेण्टसाठी 1800222365 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. तर 022-26592363-65, 022-26590686 या क्रमांकावरून थेट सहआयुक्त (औषध) बृहन्मंबई, विनिता थॉमस यांच्याशीही थेट संपर्क साधत स्टेण्टच्या उपलब्धची माहिती घेता येईल.

Loading Comments