Advertisement

अडीच महिन्यानंतर द्रविता चालली स्वत:च्या पायावर

ग्रॅंटरोडच्या भाटीया रुग्णालयाने द्रवितावर तत्काळ केलेल्या उपचारांमुळेच ती पुन्हा स्वत: च्या पायावर उभी राहू शकली. वॉकरच्या साहाय्याने चालू लागली. रेल्वे अपघातात द्रविताला उजवा तळपाय आणि डाव्या हाताची बोटं गमवावी लागली. पण, या सर्व परिस्थितीवर मात करत द्रविताला भाटीया रुग्णालयातील डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया करत जीवदान दिलं.

अडीच महिन्यानंतर द्रविता चालली स्वत:च्या पायावर
SHARES

सँण्डहर्स्ट रोड स्थानकात ७ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली २३ वर्षीय द्रविता सिंह तब्बल अडीच महिन्यानंतर केवळ स्वत: च्या पायावर उभीच राहिली नाही, तर मोठ्या आत्मविश्वासाने चालली देखील. तिचं प्रत्येक पाऊल
संकटकाळात जिद्द न हारणाऱ्या तमाम तरूणींना पथदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी दिली.


परिस्थितीवर केली मात

ग्रॅंटरोडच्या भाटीया रुग्णालयाने द्रवितावर तत्काळ केलेल्या उपचारांमुळेच ती पुन्हा स्वत: च्या पायावर उभी राहू शकली. वॉकरच्या साहाय्याने चालू लागली. रेल्वे अपघातात द्रविताला उजवा तळपाय आणि डाव्या हाताची बोटं गमवावी लागली. पण, या सर्व परिस्थितीवर मात करत द्रविताला भाटीया रुग्णालयातील डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया करत जीवदान दिलं.



नेमकं काय घडलं?

कल्याणला राहणारी द्रविता नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जायला निघाली. सॅंडहर्स्ट रोड स्थानकाजवळ ट्रेन पोहोचल्यावर दारात मोबाइलवर बोलत उभी असताना मोबाइल चोराने द्रविताच्या डोक्यात बांबूने हल्ला केला. हा हल्ला एवढा जबरदस्त होता की, द्रविता रेल्वे ट्रॅकवर पडली. ती ज्या ट्रॅकवर पडली त्या ट्रॅकवरुन फास्ट लोकल येत होती. तेव्हा द्रविता पूर्णपणे शुद्धीवर होती. सर्व बळ एकवटत ती ट्रॅकवरून बाजूला झाली, तरी तिचा पाय धावत्या ट्रेनखाली आला.


द्रविताने लक्षणीय प्रगती केली आहे. आज ती एक विशेष फूटवेअर घालून स्वत:च्या पायाने चालली. ती लवकरच पुन्हा लोकलमधून प्रवास करू लागेल. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात द्रविताने तिच्या पायावर मॅरेथॉन धावावी आणि निश्चय, कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर काहीच कठीण नाही हे सिद्ध करावं. तिच्या उपचारांत वॅक शस्त्रक्रियेची खूप मोठी मदत झाली. वेळेवर उपचार झाल्यामुळे ती बरी होऊ शकली.
- डॉ. शैलेश रानडे, प्लास्टिक सर्जन, भाटिया रुग्णालय


पुढच्या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये

पुढच्या वर्षी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सहभागी होण्याचं द्रविताचं स्वप्न आहे. त्या दिशेने ती प्रयत्न देखील करत आहे. आताच माझी टीवायची परीक्षा झाली आहे. त्यानंतर पुन्हा जॉब करण्याची इच्छा असल्याचंही द्रविताने सांगितलं.

द्रविताने रुग्णालयात उपचार घेताना पराकोटीच्या वेदना आणि नैराश्याचा सामना केला आहे. त्यावर बोलताना भाटीया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बोधनकर यांनी द्रविताने तरुण वयात दाखवलेल्या समजुतदारपणाचं कौतुक केलं.



हेही वाचा-

ट्रेनच्या दारात उभं रहाणं द्रविताला भोवलं, तीन बोटं आणि पायावरून गेली ट्रेन

धाडसी द्रविता २१ दिवसांनी परतली घरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा