Advertisement

ठाण्यातील करोनाबाधितांवर होणार 'सिव्हिल'मध्ये उपचार


ठाण्यातील करोनाबाधितांवर होणार 'सिव्हिल'मध्ये उपचार
SHARES

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं आता या रुग्णांवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर सिव्हिलमध्येच उपचार होणार असून या रुग्णालयातील अन्य रुग्णांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली. तसंच, ठाणे शहरासह इतरही शहरांत अलगीकरण केंद्रही तातडीनं सुरू केली. मात्र, एखादा करोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्या रुग्णाला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात येत होते. ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १६पर्यंत गेला आहे.

याशिवाय जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या महापालिका हद्दीमध्ये रुग्ण आढळून आलं आहेत. शिवाय जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. ही बाब सर्वांची चिंता वाढवणारी आहे. मात्र करोना रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं राज्यातील ३० सरकारी रुग्णालयं विशेष रुग्णालये म्हणून नुकतीच घोषित केली आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा