मुंबईबाहेरून येणारे क्षयरुग्ण घटले - महापालिकेचा दावा

Mumbai
मुंबईबाहेरून येणारे क्षयरुग्ण घटले - महापालिकेचा दावा
मुंबईबाहेरून येणारे क्षयरुग्ण घटले - महापालिकेचा दावा
See all
मुंबई  -  

मुंबईत मागील वर्षांमध्ये क्षयरोगाच्या आजारात वाढ झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाच आता या आजाराचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. एवढेच नाही तर, मुंबईत बाहेरून येणाऱ्या क्षयरोग रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. संपूर्ण भारतात डॉट्स सेंटरची सुविधा वाढलेली असल्यामुळे मुंबईमध्ये क्षयरुग्ण येण्याची संख्या कमी असून सध्या मुंबईत असलेले एकमेव शिवडीतील क्षयरोग रुग्णालय पुरेसे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबईतील आणि आशिया खंडातील एकमेव असलेले क्षयरोग रुग्णालय मुंबई महापालिकेच्या वतीने चालवले जात असून शिवडी येथे 1200 खाटांचे हे एकमेव क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी तपासणी, निदान, भरती, औषधोपचार, आहार आणि समुपदेशन विनामूल्य दिली जाते. रुग्णांचे निदान आणि उपचार या सर्व बाबी केंद्र आणि राज्याच्या केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉट्स प्रणालीद्वारे (प्रत्यक्ष देखरेखीखाली उपचार) करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.


10 ते 20 टक्केच रुग्ण रुग्णालयात दाखल

क्षयरोग रुग्णालयात अत्यवस्थ स्वरुपाचे क्षयाचे रुग्ण दाखल करण्यात येतात. सध्या मुंबईत 273 डॉट्स सेंटर आणि 8 ड्रग रेजिस्टंट टी. बी सेंटर्स कार्यरत आहेत. त्यानुसार रुग्णांना प्रत्यक्ष उपचार त्यांच्या घराजवळच देण्यात येते. फक्त 10 ते 20 टक्केच रुग्णांनाच क्षयरोग रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज भासते, असे केसकर यांनी स्पष्ट केले. 1200 खाटांच्या या रुग्णालयात पूर्वी एकूण खाटांच्या तुलनेत 80 ते 90 टक्के रुग्ण दाखल असायचे. पण, आता हेही प्रमाण कमी होऊन 70 टक्क्यांवर आले असल्याचे केसकर यांनी सांगितले.
संपूर्ण भारतातून येणाऱ्या क्षयरोग रुग्णांची वाढत असलेली संख्या विचारात घेता शिवडीतील क्षयरोग रुग्णालयावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे आणखी एक क्षयरोग रुग्णालय महापालिकेच्यावतीने उभारण्यात यावे, अशी मागणी अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली हाती. पण मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे नवीन रुग्णालय सुरू करण्याची तुर्तास आवश्यकता वाटत नसल्याचे पद्मजा केसकर यांनी आपला अभिप्राय दिला आहे.


कुपर रुग्णालयातही डीआर टीबी सेंटर

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात सन 2013 पासून एमडीआर आणि एक्सडी रुग्णांकरता 200 खाटा असलेला विभाग सुरू करण्यात आला. कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डीआर अर्थात ड्रग रेजिस्टंट टीबी सेंटर चालू करण्यात आले आहे. सर्वोदय रुणालयात 20 खाटांचा आंतररुग्ण विभाग एमडीआर रुग्णांसाठी सुरू करण्यात आला आहे. गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय येथे एमएसएफ या स्वयंसेवी संस्थेमार्फत नवीन डीआर टीबी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. अंधेरीतील कुपर रुग्णालय आणि शिवडी टीबी रुग्णालय येथील डी. आर. टीबी सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे केसकर यांनी स्पष्ट केले.


क्षयरोग रुग्णांवरील उपचार यंत्रणा

  • 10 ते 20 टक्क्केच क्षय रुग्णांवर रुग्णालयात उपचार
  • 80 टक्के बाह्य रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार
  • 273 डॉट्स सेंटर
  • 8 ड्रग रेजिस्टंट टीबी सेंटर
  • 3000 एमडीआर टीबीचे रुग्ण
  • 200 खाटा राखीव एमडीआर, एक्सडी टीबी रुग्णांकरता
  • 5 वर्षात शिवडी रुग्णालयातील 38 कर्मचाऱ्यांचा टीबीमुळे मृत्यूहे देखील वाचा -

आता ‘डीएनए’मधून होणार क्षयरोगाचं निदान

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट


मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा


(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.