Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये 2 नवीन कोरोना उपचार केंद्रे, 'इतक्या' खाटांची व्यवस्था

गुरूवारी मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे १४५ नवे रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंत शहरात आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

मिरा-भाईंदरमध्ये 2 नवीन कोरोना उपचार केंद्रे, 'इतक्या' खाटांची व्यवस्था
SHARES

मिरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गुरूवारी मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे १४५ नवे रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंत शहरात आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरात करोनाबाधितांची संख्या एक हजार ३३८ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात आणखी दोन कोरोना उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील सभागृह व वाहनतळाच्या जागेवर कोरोना उपचार केंद्रे तयार करून देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्या दोन सभागृहांत कोरोना उपचार केंद्रे तयार करण्याचे आदेश म्हाडाला दिले आहेत.  

मिरा रोडच्या इंद्रलोकमधील मीनाताई ठाकरे सभागृह व भाईंदर पूर्व परिसरातील प्रमोद महाजन सभागृहात कोरोना उपचार केंद्र तयार करण्यात येणार आहेत. दोन्ही उपचार केंद्रांत ४५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपचार केंद्रांचे काम गुरुवारपासून सुरू झालं आहे. या उपचार केंद्रांचा सर्व खर्च म्हाडाचा निधीतून केला जाणार आहे. 

सध्या पं. भीमसेन जोशी रुग्णालयात ४० खाटा, इंद्रलोक परिसरातील समृद्धी या इमारतीतील उपचार केंद्रात ८१४ खाटा अशा एकूण एक हजार ३०४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.  कोरोनाची लागण झालेल्या ज्या रुग्णांना मध्यम स्वरूपाची बाह्य लक्षणे व तीव्र बाह्य लक्षणे आढळून येत आहेत, अशांना कोरोना उपचार केंद्रात ठेवण्यात येत आहे.


हेही वाचा -

बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा